समाज जीवनाच्या सर्व अंगात हिंदुत्वाचा संचार हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे फलित - मा. श्री मिलिंदजी परांडे, केंद्रीय महामंत्री, विश्व हिंदू परिषद

July 27, 2022

image not found image not found

विश्व हिंदू परिषदेच्या कार्याशी लोक वेगवेगळ्या माध्यामतून परिचित आहेत. अनेक वेळा समज गैरसमज होउ शकतात म्हणून योग्य भूमिका सर्वाना परिचित व्हावी याकरिता अश्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. कुठल्याही बाबतीत विचार केला तर सर्वात प्रथम नकारात्मक भूमिका समोर येते अनेक समस्या आहेत असे वाटते परंतु हिंदूंसाठी गेल्या १५०० वर्षात नव्हती एवढी अनुकुलता आताच्या कालखंडात आहे. यावेळी आपण काय करू शकतो याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. समस्या, आव्हाने नाहीत असे नाही ते आधीही होते, आताही आहे, आणि पुढेही राहतील. परंतु त्या कमी कश्या होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज देशात निराश होण्यासारखे चित्र नाही.जुन्या जीवनमूल्यांच्या आधारावर नव्या भारताची निर्मिती करावयाची आहे.सर्व संताच्या मार्गदर्शनात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात सर्व हिंदू समाजाने केलेले रामजन्मभूमी अभियान हे हिंदू समाजासाठी स्वाभिमान जागरणाचे आंदोलान ठरले.आज समाज जीवनाच्या सर्व अंगात हिंदुत्वाचा संचार हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे फलित आहे. हिंदू समाज स्वभिमानासाठी जागृत होऊन उभा राहतांना सर्व जगाने यानिमित्ताने बघितला व यावर आपले मत प्रकट केल्याचे अनेक दाखले आहेत. भारत व हिंदू सभ्यता, संस्कृती केवळ स्वताःच्या भौतिक कल्याणाकरिता उभा राहत नाही तर तो विश्व कल्याणाकरीता उभा राहतो. याकरिता आपल्याला सर्वांना उठून उभे राहावे लागेल अन्य कोणी उभे राहणार नाही. व त्या आधारावरच आपण विश्व कल्याणाकरिता मार्गदर्शक होऊ शकणार आहोत. आपण आर्थिक महासत्ता होतोच आजही आपली वाटचाल त्या दिशेने होत आहे. आपण म्हणतो आपण स्वाधीन तर झालो परंतु स्वतंत्र खरच झालो का यावर आपण विचार केला पाहिजे. आपल्या भूमिकेवर आपल्या मुल्यांवर आधारित तंत्र विकसित करण्याची गरज आहे ती आजची आवश्यकता आहे. आज परिवर्तन होत आहे. गती येण्याकरिता आपले सर्वांचे सकारात्मक योगदान अत्यावश्यक आहे. आपल्या भारताजवळ सर्वात मोठा तरुणांचा संच आहे, सर्वात मोठी कृषी योग्य जमीन आहे. आणि सर्वात जास्त सिंचनयुक्त जमीन सुद्धा भारताकडे आहे. याला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या विशेष संपर्क विभागाच्या वतीने आयोजित डॉक्टर,सी,ए,,वकील, अभियंता, उद्योजक, राजकीय व सामाजिक नेते व प्रबुद्ध नागरिक यांच्या दिनांक २६ जुलै २०२२ रोजी आयोजित एकत्रीकरण कार्याक्रमात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मा. श्री मिलिंदजी परांडे यांनी प्रतिपादन केले.

जगाला समाधान आणि शांती पाहिजे असेल तर त्याला हिंदूला शरण जावे लागेल. असे अनेक पाश्चात्य विचारवंतांनी लिहून ठेवले आहे. परंतु जगाच्या सर्व समस्याना व प्रश्नांना उत्तर देणारा ताकदवान, बलशाली, समर्थ आणि सक्षम असा हिंदू समाज आणि भारत देश उभा करणे हे आपणा सर्वांना करवयाचे आहे. आपण हे काम केवळ हिंदुंच्या कल्याणासाठीच करतो असे नाही तर जगाच्या कल्याणासाठी करतो आहोत हा भाव ठेवून प्रत्येक हिंदुनी हे कार्य केले पाहिजे असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे.

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मा. श्री मिलिंदजी परांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष मा. श्री पांडुरंगजी राऊत, पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री श्री संजयराव मुदराळे, मुंबई व बंगलोर क्षेत्र विशेष संपर्क प्रमुख श्री संजयराव ढवळीकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत विशेष संपर्क प्रमुख श्री किशोरजी चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत व कोंकण प्रांत संघटनमंत्री श्री अनिरुद्धजी पंडित व प्रांत सहमंत्री श्री सतीशजी गोरडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व परिचय श्री किशोरजी चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन श्री श्रीकांतजी चिल्लाळ यांनी केले. शांतीमंत्राने कार्याक्रमची सांगता झाली.

  प्रस्तुत कर्ता – श्री विवेक सोनक, प्रांत प्रचार प्रमुख , विश्व हिंदू परिषद , पश्चिम महाराष्ट्र प्रांत